आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे ठिय्या आंदोलनाला.......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रा.प्रतिनिधी - नितेश केराम मो.न.+91 86984 23828
आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांच्या ठिय्या आंदोलनाला भेट दिली व ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून समस्या मार्गी लाऊ नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांची ग्वाही
कोरपना तालुक्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक महिलांचे तहसील कार्यालय कोरपना येथे आपल्या विविध मागण्यासह ठिय्या आंदोलन सुरू असुन या आंदोलनाला नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष यांनी भेट दिली आशा वर्कर यांनी आपल्या समस्या मांडल्या आँनलाईन कामे बंद करा, किमान वेतन लागू करा, आशा सुपर वायझर यांना कंत्राटी कर्मचार्यामध्ये समाविष्ट करा, कोरोना काळातील बोनस द्या,प्रस्तुती काळात भर पगारी रजा मंजूर करा अशा विविध मागण्या सांगितल्या मागण्या ऐकुण घेऊन या मागण्या ना. सुधीर मुनगंटीवार वन,मत्स्य व्यवसाय,सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री तथा चंद्रपूर,वर्धा जिल्हा पालकमंत्री यांचे माध्यमातून सरकार दरबारी मांडु व या मागण्या सोडविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करु असे आश्वासन दिले या आंदोलनात फरजाना शेख,सुरेखा मुक्के, जोत्स्ना पंदरे, पौर्णिमा निरंजने,लक्ष्मीबाई कुळमिथे, सखुबाई खोके, सविता निखाळे,सुहासिनी उपरे,ललिताबाई गोंडे, शकुंतला पोयांम आदी आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
