सावळी सदोबा येथे विघुत महावितरण विरोधात रस्ता रोको आंदोलन.....
सिंचनासाठी वीज मिळत नसल्याने परीसरातील शेतकऱ्यांत संताप......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील वसंतराव नाईक चौकात परीसरातील हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थित आज विद्युत महावितरण कंपनीच्या विरोधात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती,
मागील अनेक दिवसापासून सावळी सदोबा परीसरातील विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने,या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असुन सुद्धा शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मिळत नसल्याने, वीज वितरण विषयी शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक वाळूत जात आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्रांसाना समोरे जावे लागत आहे, विज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे परिसरातील नागरिकांनी आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला आहे,अनेक दिवसापासून चालू असलेल्या खंडीत विज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाळूत जात आहे,पाणी असून सुद्धा शेतकऱ्यांना विजे अभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नाही आहे.
विज महावितरण कंपनीकडून सदरची समस्याची दखल घेण्यात येत नसल्याने शेतकऱ्याच्या शेतातील पिक धोक्यात आले आहे, खंडित वीज पुरवठ्यामुळे गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील मोटर पंप सुद्धा बंद आहे,गावात पाणी पुरवठा करणे कठीण झाले आहे,गावा गावातील पिठ गिरणी बंद आहे, त्यामुळे त्रासलेल्या नागरिकांनी आज आंदोलनाच्या माध्यमातून रोष व्यक्त करण्यात आला.
वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गुल्हाणे ,कनिष्ठ अभियंता शिवणकर ,यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश राठोड, नुरसिंग राठोड, राजु राऊत, अंबादास राठोड, भास्कर जगताप व रमेश राठोड, अमीत ठाकरे, हिरासिंग राठोड, सुरेश पवार सह परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी व वीज ग्राहकांनी उपस्थिती लावली.

