Top News

तळोधी (बा.) येथील डॉ.स्नेहा नरेंद्र मेश्राम ने मिळविले पहिल्याच प्रयत्नात एमपीएसी परिक्षेत सुयश....Dr. Sneha Narendra Meshram from Talodhi (Ba.) succeeded in the MPAC exam in the first attempt....

तळोधी (बा.) येथील डॉ.स्नेहा नरेंद्र मेश्राम ने मिळविले पहिल्याच प्रयत्नात एमपीएसी परिक्षेत सुयश....



विदर्भ माझा न्युज 24 - तळोधी (बा.)

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या २०२२ च्या पशूधन विकास अधिकारी वर्ग - अ या परिक्षेत डॉ.स्नेहा हिने घवघवीत यश प्राप्त केले. महाराष्ट्र राज्यातून २०६ वा तर अनुसूचीत जाती महीला मधून ३रा क्रंमाक प्राप्त केला. डॉ. स्नेहा ही नरेंद्र व विमल मेश्राम यांच्या सामान्य कुटूंबात जन्मलेली लेक आहे. आपल्या जिद्दीने व अभ्यासू वृत्तीने या पदापर्यंत पोहचलेली आहे. 

वडील नरेंद्र मेश्राम हे महात्मा फुले उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम तळोधी  (बा.) येथे पूर्ण वेळ शिक्षक ( प्रात्यक्षिक ) या पदावर कार्यरत आहेत.  

                                डॉ स्नेहा चे प्राथमिक शिक्षण जनकापूर येथून पूर्ण झाले. माध्यमिक शिक्षण महात्मा फुले विद्यालय तळोधी (बा.) येथून पूर्ण झाले. शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथून पदवी संपादन केली. शासकीय पशू वैद्यकीय महाविघालय परभणी येथून पदव्यूतर शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात पशूधन विकास अधिकारी वर्ग-अ या पदाला गवसणी घातली.                               

 डॉ. स्नेहा ने मिळविलेल्या यशाबद्दल कल्याण शिक्षण संस्था नागपूर चे अध्यक्ष  उन्मेष गेडाम. सरचिटणीस सौ मालती  गेडाम. गोविद प्रभू कला वाणीज्य महाविघालयाचे प्रभारी प्राचार्य  रॉय, महात्मा फुले उच्च माध्यामिक विद्यालयाचे प्राचार्य  बुलबूले, उपप्राचार्य  कोराने, पर्यवेक्षक  कोहपरे तसेच महात्मा फुले विद्यालय व उच्च माध्यामिक विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक यानी अभिनंदन केले. डॉ स्नेहाने आपल्या यशाचे श्रेय आजी, आई वडील, बहीण, भाऊ तसेच नातेवाईक व आपल्या शिक्षक, प्राध्यापकाना दिले आहे.              .

Previous Post Next Post