Top News

Wild animal wild boar in the field....Big loss of crops....Farmers are worried.... Barbed wire coupons, jatka machines should be given for wildlife protection - Sanjay Jadhav

वन्यप्राणी वराह ची शेतात धुम....शेतपिकांचे मोठे नुकसान....शेतकरी चींतेत....


वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काटेरी तार कुपन,झटका मशीन देण्यात यावे - संजय जाधव



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 

             कोरपना तालुक्यातील वनपरिक्षेत्र वनविभाग वनसडी अंतर्गत येत असलेले पिपरडा, वनसडी,धानोली, कारगाव, मरकागोंदी, बेलगाव, चिंचोली,पाकडहिरा, सोणूर्ली इत्यादी गावाच्या शेत शिवारातील वन्यप्राणी रोही व वराह (डुकर)च्या उपद्रवाने लागवड केलेली उभे पिके  कापुस,तुर ,ज्वारी सोयाबीन इत्यादी पिकांचे रात्री व दिवसा शेतात शिरून उभ्या असलेल्या पिकाची तुडवन करून नासधूस  होत आहे यातून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे..


वनविभाग वनसडी यांना वारंवार सागून सुद्धा याकडे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे तसेच पिकांच्या संरक्षणासाठी तात्काळ उपाय योजना करण्यासाठी  मौजा पिपरडा येथील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तारेचे  कुंपण व झटका  मशिंनची  पत्रा द्वारे मागणी केली  पण गेल्या तीन महिन्यापासून  कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्याना झाली नाही व या मागणीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

याविषयाला अनुसरून वरिष्ठ  अधिकाऱ्यानी शेतकऱ्याची समस्या लक्षात घेऊन झालेल्या पिकांची नुकसानभरपाई तसेच सर्व शेतकऱ्यांना तारेचे कुंपण व झटका मशीन देण्यात यावी अशी आग्रही मागणी पिपरडा चे ग्रां .पं.सदस्य संजय जाधव यांनी केली आहे



Previous Post Next Post