कळमना येथे राजुरा मुक्ती संग्राम दिन उत्साहात.
जेष्ठ समाजसेविका जिजाबाई मेश्राम यांच्या हस्ते ध्वजारोहण.
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील मौजा कळमना ग्रामपंचायत येथे १७ सप्टेंबर मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे कळमना चे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला ध्वजारोहणाचा मान कळमना येथील जेष्ठ समाजसेविका निवृत्त अंगणवाडी मदतनीस सौ. जिजाबाई पुंडलिक मेश्राम यांना देवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच नंदकिशोर वाढई हे कळमना येथे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. ते गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते असून नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज कळमना येथे अनेक वर्षांपासून सामाजिक काम करणारी जिजाबाईला सरपंचांनी ध्वजारोहण करण्याचा मान दिला.
निश्चितपणे यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जाईल व तळागाळातील सामाजिक काम करणारी जिजाबाई पुंडलिक मेश्राम हिला सुध्दा आपण गावामधये जे सामाजिक हित लक्षात घेऊन काम केले त्याचं एक आगळा वेगळा आनंद तिला तर झालाच पण मला सुद्धा झाला. जिजाबाई नेहमी आमच्या बालपणी त्या वेळी आरोग्याच्या कुठल्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना ती बाळंतपण करण्यास मदत करायची. माझ्या जन्माच्या वेळी तसेच इतर अनेकांच्या जन्मवेळी सुध्दा जिजाबाई नी मदत केली. जिजाबाई ने भारताचा तिरंगा ध्वज फडकवला याचा मला आनंद आहे. यामधुन निश्चितच गावकऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल याची खात्री सरपंच नंदकिशोर वाढई यांनी यावेळी व्यक्त केली.
या प्रसंगी उपसरपंच कौशल्या कावळे, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, रंजना पिंगे, सुनीता उमाटे, ग्रामसेवक मरापे, माजी पोलीस पाटील भाऊजी वाढई, माजी उपसरपंच महादेव ताजणे, क्षावण कुचनकर मंगेश क्षिरसागर सुरेश कावळे, उध्दव आसवले, देवराव वांढरे, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय पिपळशेंडे, देवाजी पाटील चापले, अनिल मेश्राम, महादेव आबिलकर, मारोती बल्की, नत्थु वडस्कर, महिला प्रभात संघ अध्यक्ष मिना भोयर, मनिषा आबिलकर, गोखरे मॅडम , दुधे मॅडम , संगिता उमाटे, लता क्षीरसागर, कल्पना क्षिरसागर, शांताबाई विददे, सपना मेक्षाम, शिपाई सुनिल मेक्षाम, विशाल नागोसे यासह समस्त गावकरी उपस्थित होते.



