पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबिनवर प्रादुर्भाव....शेतकरी चींतेत ।
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी दिपक चीवाने 9096181496
सध्या सोयाबीन पिकावर येलो मोजा नामक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून,कोरपना तालुक्यातही येलो मोजा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे.पिके चांगलीच हिरविगार झाली असताना आणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतानाच रोगाने पिके उद्धवस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे हातचे उत्पन्न जाणार की आही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.खरीप हंगामातील सोयाबीनचे पिक म्हणजे अर्धवार्षिक बोनस असल्याचे बोलले जाते.
दसरा,दिवाळीच्या मुहूर्तावर सोयाबीनचे पिक विक्री योग्य होऊन बाजारपेठेत विक्रीसाठी नेल्या जाते.ज्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी सन उत्साहात साजरा होतो. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तालुक्यातील ९0 टक्के सोयाबिनाच्या पिकावर येलो मोजा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.संपूर्ण पिक करपत आहे.अनेकांचे पिक तर उद्धवस्त झाले आहे.मागील काही दिवसांपासून तालुक्यातील सोयाबीन पिकांवर हा रोग पसरत असताना तालुका कृषी विभाग झोपेचे सोंग घेऊन असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.अद्यापही पिकांचे पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांचे पंचनामे करून तातडीची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


