कान्हाळगाव येथे एक गाव एक गणपती....गावात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन ।
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी नितेश केराम - 8698423828
कान्हागाव येते दि.19 / 9 /23 रीजी गणेश चतुर्थीच्या शुभ मुहर्तावर नवयुवक बाल गणेश मंडळ येथे गणेरायाचे मोठ्या थाठ्ठात व उत्साहात आगमन झाले.
मागील 10 ते 15 वर्षां मध्ये कान्हाळगाव येथे दोन गणपती बसायचे परंतु या वर्षी नवनिवार्चित सरपंच सुरेखा नवले यांच्या नेतृत्वाखाली काल कान्हाळगाव मध्ये परिवर्तन घडून आले. कान्हाळगावामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षांपासून दोन गणपती होते पण कान्हागाव मध्ये गाव एक गणपती यांचं आगमन झाल हें परिवर्तन अनेक वर्षांनंतर गावात पाहायला मिळत आहे.
परंतु कान्हाळगाव येथे एक गाव एक गणपती असल्यामुळे गावात आनंदाचे भक्तीमय वातावरण निर्माण झाले तसेच गावकऱ्यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या आपला एक जूट राहिला पाहिजे आणि आपल्या गावामध्ये कसल्याहीं प्रकारची अनुच्चीत प्रकार घडु नये तसेच 10 दिवस आपले हें गणपती बापाच्या आशीर्वादाने मौज मस्ती मध्ये गेले पाहिजे असे गाव कऱ्यांनी गणपती बाबाला साकळे घातले आहे.
आणि आताची जी येणारी पीडी आहे त्यानीं सुद्धा 10 दिवस मज्या करावी आणि उठवायच्या दिवशि दंगा नको आणि कोणता प्रकारचा धुम्रमापन,मद्यप्राण नको जसा आज गणपती गावामध्ये आगमन झाल तसेच अनंत चतुर्थी दिवशी शांततेने उठवावे अशी गावातील नागरिकांची विनंती गावर्यांनी आपल्या गावा मध्ये एक गाव एक गणपती आगमन झाले तसच समोर असंच चालू ठेवावे या नवीन पीडीने अशी गावकऱ्यांनी गणपती पुढे साकळे घातले आहे, आणि नवयुवक बाल गणेश मंडळाला शुभेच्छा दिल्या आहे.
