विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी शिवसेना पदाधिकार्याचा मुल चा आगार प्रमुखांना घेराव ।
बसचा फेऱ्या न वाढवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू मूल तालुकाप्रमुख यांचा आगरप्रमुखाना इशारा......
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख यांचे आदेशाने व नितीन मते शिवसेना जिल्हाप्रमुख यांचे मार्गदर्शनात आकाश कावळे शिवसेना तालुका प्रमुख मुल विशाल नागुलवार शिवसेना शहर प्रमुख मुल व पंकज वडेट्टीवार शिवसेना तालुका प्रमुख पोंभुर्णा यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मूल आगार प्रमुखांना घेराव घातला. मुल तालुक्यातील चिरोली, सुशी,गडिसुरला, जुनासुर्ला,चांदापूर या ग्रामीण क्षेत्रातील अंदाजे दीडशे ते दोनशे विद्यार्थी विद्यार्थिंनी दररोज महामंडळाच्या बसने शालेय शिक्षणाकरिता प्रवास करतात.
मूल आगाराच्या गलथान व्यवस्थेमुळे व ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याचा त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे. शालेय वेळेवर बसेसची उपलब्धता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी नेहमीच उशीर होतो त्यामुळे त्यांचे सुरुवातीचे तास त्यांना मिळत नाही यातील बरेचसे विद्यार्थी हे नवभारत कन्या विद्यालय मुल येथे शिक्षण घेत असून त्यांच्या शाळेची वेळ ही सकाळी साडेसात ते बारा वाजेपर्यंत असते बसेस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचण्यासाठी नेहमीच सायंकाळपर्यंत बसेसची वाट बघत बसावं लागतं त्यातही कळस म्हणजे ज्यावेळेस बस डेपोमध्ये येते त्यावेळेस चालक व वाहक कर्मचारी हे विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देत असतात.
त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन शिक्षणा वरही परिणाम होत आहे. या गोष्टीवर त्वरित आळा घालण्यासाठी ही गंभीर बाब लक्षात घेऊन नवभारत कन्या विद्यालयाच्या प्राचार्य अल्का राजमलवार यांनी शिवसेना तालुकाप्रमुख आकाश कावळे यांच्याशी संपर्क साधून या सर्व गोष्टीची माहिती त्यांना दिल्याच आकाश कावळे म्हणाले.
आकाश कावळे यांनी तत्परतेने मूल आगार व्यवस्थापका कडे सर्व शिवसैनिक व विद्यार्थ्यांना घेऊन तात्काळ या गोष्टीचा निराकरण करावे यासाठी त्यांना घेराव घातला जर येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांसाठी जादा बसेसची व्यवस्था व बस चालक - वाहक यांना विद्यार्थीह व विध्यार्थीनींना योग्य वागणूक देण्याचे निर्देश द्या मागणी पूर्ण न केल्यास शिवसेना स्टाईलने मूल बस स्थानकात आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला यावेळी त्यांचे समवेत विशाल नागुलवार शहर प्रमुख मूल, पंकज वडेट्टीवार तालुकाप्रमुख पोंभूर्णा, अफजल वाढई तालुका संघटक मूल, संतोष इपलवार उपतालुका प्रमुख मूल, अशोक गगपल्लीवार, दिवाकर झरकर, जयंत मांदाळे, ऋषभ याटेवार, कालिदास बामणे, गौरव पिल्लरवार, चिंकू नीकोडे, रमेश कुडमेथे व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते

