शेतकरी कृती समिती चे नेते डॉ.पुखराज रेवतकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या समस्यांबाबद खासदार कृपाल तुमाने यांना निवेदन...
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
रामटेक लोकसभा खासदार कृपाल तुमाने काटोल क्षेत्राच्या दौऱ्या वर असतांना त्यांनी सायंकाळी कृष्णा डफरे यांच्या निवास स्थानी भेट दिली, त्यावेळेस शेतकरी कृती समिती चे नेते डॉ.पुखराज रेवतकर यांच्या नेतृत्वा खाली शेतकऱ्यांच्या समस्या वर त्यांना निवेदन देण्यात आले.
१. निवेदनात नियमित कर्ज फेडनाऱ्यांना रुपय ५० हजार प्रोत्साहन अनुदान त्वरित द्यावे.
२. शेतकऱ्यांच्या सुयोग्य दळण वळणासाठी पांधन रस्ते बांधून अतिक्रमणे मोकळी करावी
३. २०२२-२३ पीक विम्याचा मोबदला मिळाला नाही तसेच पीक विमा कंपनीवर कायदेशिर कारवाई करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वसूल करून टाकण्यात यावी.
४. शेतकरयांना उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव अधिक ५० % नफा जर देण्यात आला तर शेतकरी आत्महत्या थांबतील यात शंका नाही त्यामुळे शेत मजुरांचा प्रश्न ही सुटेल.
खासदारांनी समस्येचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
मा वेळेस शिष्टमंडळात डॉ. पुखराज रेवतकर, कृष्णा डफरे , प्रा. रत्नाकर बोंद्रे , प्रा. वीरेंद्र इंगळे , मनोज जवंजाळ, बाबाराव वाघमारे , पुरुषोत्तम धोटे , गंगाधर वंजारी , डॉ. सुधाकर कावळे , रमेश पांडे यांचा समावेश होता.
