Top News

Even in heavy rains, farmers' public protest march led by Vidarbha activist Sudam Rathod hit the tehsil office in Jivati.

भर पावसातही जिवती येथे विदर्भवादी सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडकला शेतकर्यांचा जन आक्रोष मोर्चा ।



 विदर्भ माझा न्युज 24 - जिवती 

भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले तरी जिवती तालुका मात्र विकासापासून कोसो दूर, जिवती तालुका हा डोंगराळ व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. 1955 पासून जिवती तालुक्यातील शेतकरी शेतीची मशागत करून आपला उदरनिर्वाह करतात. जिवती तालुक्यातील  90% शेती निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. या जिवती तालुक्यातील 70% टक्के शेतकरी जनतेला आतापर्यंत शेतीचे त्यांच्या हक्काचे जमीनपट्टे मिळालेले नाही आणि घराचे सुद्धा पट्टे मिळालेले नाही, म्हणून या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही, शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन खालील मागण्या पूर्ण कराव्यात. 



1) तीन पिढ्याची अट रद्द करून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे द्या.

2) जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करण्यात यावे.

3) जिवती येथे न्यायालय सुरु करा.

4) जिवती येथे बसस्थानक तात्काळ मंजूर करा.

5) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची निधी तात्काळ जमा करण्यात यावे.

6) नगरपंचायत जिवती येथे मंजूर असलेले रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे.

7) जिवती तालुक्याच्या विकास कामासाठी लागणारी वनविभागाची विविध (NOC) ची अटी रद्द करा.

8) जिवती येथे भारतीय स्टेट बँक शाखा तात्काळ मंजूर करा.

9) नगरपंचायत जिवती येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर असलेले  664 घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी तात्काळ देण्यात यावी.

10) जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्वे करून देण्यात यावे.

11) जिवती तालुक्यातील सर्व गाव व तांड्यामध्ये सर्वे करून गावठाणा वाढवून तात्काळ देण्यात यावे.

अस्या या शेतकरी जनहिताच्या विविध मागण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ॲड. माजी आमदार वामनराव चटप  यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात शेतकरी जन आक्रोश मोर्चा जिवती येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आले. 

आंदोलनात सहभागी विशाल राठोड, सय्यद इस्माईलभाई, शबीर जहागीरदार, विनोद पवार, गणेश कदम, नरसिंग हामने,नामदेव राठोड, कर्मराज कांबळे,नीलकंठराव कोरंगे, सुनील बावणे, मिथुन चव्हाण, अमोल चव्हाण, रवींद्र राठोड, कपिल जाधव, अंबादास चव्हाण, देवला चव्हाण, रमेश पवार, व्यंकटी जाधव, प्रकाश राठोड,बालाजी बनसोडे, रामेश्वर नामपल्ले, रघुनाथ पोले व शेतकरी बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post