पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी - नारायण हिवरकर
विदर्भ माझा न्युज 24 - ग्रामीण प्रतिनिधी - नितेश केराम : +91 8698423828
लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2023 - 24 अंतर्गत तालुकास्तरीय " भूमिका अभिनय स्पर्धा " आणि " लोकनृत्य स्पर्धा " जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव येथे आयोजित करण्यात आली, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष कान्हाळगाव शाळेचे शा. व्या. स अध्यक्ष नारायण जी हिवरकर , प्रमुख अतिथी म्हणून जि. प . हायस्कूल कान्हाळगाव चे मुख्याध्यापक स्वतंत्र कुमार शुक्ला, पं. स. कोरपना चे गट साधन व्यक्ती झाडे मॅडम, परिक्षक म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा खैरगाव चे आर. डी. जाधव सर, जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा चनई च्या रचना चिडे मॅडम, जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा कोरपना चे दराडे सर तसेच कान्हाळगाव चे पत्रकार मनोज गोरे उपस्थित होते.
या स्पर्धेत सर्व विध्यार्थ्यांनि उत्कृष्ट सादरीकरण केले यात, तालुकास्तरीय " भूमिका अभिनय स्पर्धेत - जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव प्रथम, जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी द्वितीय, आणि " लोकनृत्य स्पर्धेत - जिल्हा परिषद हायस्कूल बाखर्डी प्रथम, जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव - द्वितीय, आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगांव यांनी तृतीय स्थान प्राप्त केले.
आपल्या अध्यक्षीय भाषण नारायण जी हिवरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आणि म्हणाले " पराजय न पत्करता, पुन्हा तेवढयाच ताकदीने लढणे म्हणजे जीवनात यश प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे ".
"कार्यक्रमाचे सुंदर संचालन प्रफुल जीवने, तर आभार प्रदर्शन. विठ्ठल मडावी सर यांनी केले.
