Top News

Dalit Mitra Vs. you Nagpure d. Students of Ed.College Gondpipri pass CET exam in first attempt

दलित मित्र वि. तु. नागपुरे  डी. एड.कॉलेज  गोंडपीपरीच्या  विद्यार्थियांचे सीटिईटि परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन                


विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपीपरी 

 केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या माध्यमातून 20 ऑगस्ट 2023 ला घेण्यात आलेल्या CTET परिक्षेचा निकाल 25/9/2023 ला लागला. या परिक्षेत दलित मित्र वि. तु. नागपुरे डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.

 हे विद्यार्थी डी. एल. एड. (डी. एड.) द्वितीय वर्षात शिकत आहेत. यश संपादन करणाऱ्या विद्यार्थियामधे देवराव खेकारे, कु. पल्लवी कोल्हे, कु. उज्वला बामनकर, कु. स्नेहल कोहपरे यांचा समावेश आहे. 

यश संपादन करणाऱ्या विद्यार्थींचे कॉलेजच्या प्राचार्या, अध्यापकचार्य व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post Next Post