आर्णी तालूक्यातिल पारंपारिक तीज उत्सवाची सांगता !
बंजारा वेषभूषात वाजत गाजत नृत्य करुण विसर्जन.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील सर्व बंजारा तांड्यामध्ये तिज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, दरवर्षी श्रावण महिन्यात बंजारा समाज बांधवांकडून बंजारा पारंपारिक तिज उत्सव साजरा करण्यात येतो, राखी पौर्णिमेला सर्व कुमारीका एकत्र होऊन माती आणून मंदिरावर समाजातील स्त्री व पुरुष एकत्र येतात एका टोपलीमध्ये वारुळाची माती घेऊन त्यामध्ये गहू टाकून मंदिराजवळ तिज पेरल्या जाते,यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून कुमारिका व स्त्रिया नृत्य सादर करतात विशेष म्हणजे "मन लोवडी दरादरे वीर आज म चाली रे "या बंजारा गीतावर दपडाच्या तालावर चांगला फेर धरला जातो,तीज उत्सव प्राचीन काळापासून बंजारा लोकगीत ही संस्कृती समृद्ध करणारी असतात,राखी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी अशा दहा दिवसात चालणाऱ्या या तीज सणांच्या निमिताने बंजारा समाज एकत्र येतो व दररोज कुमारिका मुली सकाळ व संध्याकाळ तीज टोपलीवर पाणी टाकण्यासाठी घरोघरी नृत्य व बंजारा गीताचा मधुर आवाजात नृत्य एक पारंपारिक समाजाचा जणू बांधिलकी प्राचीन काळापासून निभवण्याचा काम हा समाज साजरा करताना दिसतो .
बंजारा समाजामध्ये आजही बंजारा संस्कृती वेगवेगळेपणा जोपासला जातो,बंजारा तांड्यातील प्रमुख नाईक, कारभारी,आणि सर्व प्रतिष्ठित नागरिकाच्या उपस्थितीत उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा केला जातो, गोकुळ अष्टमीच्या दिवशी या उत्सवाचा समारोप होतो व डफडे नृत्यकरता करता गीताच्या तालावर डफड्याच्या आवाजावर दिवसभर सण साजरा करण शेवटी पाण्यात विर्सजन केल्या जाते आजही तीज या सणाचे महत्त्व ग्रामीण भागात महत्त्व कायम आहे.


