Top News

Taluka level school wrestling competition concluded at Mul Taluka Sports Complex!

मुल तालुका क्रीडा संकुल येथे तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न‌ !




विदर्भ माझा न्युज 24 -मुल 



नुकतेच 2023-24 शालेय क्रिडा स्पर्धेला सुरुवात झालेली आहे माननिय मुल तालुका क्रिडा अधिकारी विनोद ठीकरे यांच्या सहमतीने दिनांक 01/09/2023 शुक्रवार ला मुल तालुका क्रीडा संकुल येथे तालुका स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा संपन्न‌ झाली.

या स्पर्धेत मुल मधील  विविध शाळेत शिकत असलेल्या खेळाडूंचा सहभाग होता त्यात   मधील खेळाडूंनी घसघशीत विजय मिळवत जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी याचा निवड झालेली आहे.

या स्पर्धेचे संयोजक नामदेव पिदुरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी पार पाडली गेली  त्यात कुस्ती पंच व आखाडा प्रमुख म्हणून आकाश चौधरी  व करण कोसरे काम पाहिले तर तांत्रिक अधिकारी म्हणून नुपूर, नेत्रा, श्रुती व तनुश्री  यांनी काम पाहिले. सर्व विजयी खेळाडूंना  क्रीडा संयोजकांनी पुढील वाटचालीस शूभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post