Top News

Murder by slitting the throat.....Excitement in the city.....

गळा चिरून हत्या.....शहरात खळबळ.....






 विदर्भ माझा न्युज 24 -  चांदागड (चंद्रपूर) 

 काल दिनांक 03, सप्टेंबर ला पहाटेच्या सुमारास शहरातील मुख्य गोल बाजार परिसरात भिख मांगणाऱ्या एका इस्माची गळा चिरून हत्या करण्यात आली. भिक मागुन आपली उपजिवीका चालवीनार्या वयोवृद्धाचा गळा चीरूण हत्या केल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

65 वर्षीय मधुकर मंदेवार रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर असे मृतक व्यक्तीचे नाव आहे, गोल बाजार परिसरात मधुकर हा भिक मागत होता. 


सदर घटना ही सकाळी 07.00 ते 7.30 च्या दरम्यान उघडकीस आली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतक मधुकर वर तीक्ष्ण व धारदार हत्याराने वार केल्याची माहिती आहे.

गोल बाजार परिसरातील दुकानदार मधुकर ला नामदेव म्हणून हाक मारीत होते, मात्र आता या घटनेनंतर गोल बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शहर पोलिसांनी परिसरातील दुकानांचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजपूत आदि दाखल झाले होते.

मात्र शहरात भिक मागुण आपली उपजिवीका चालवीणार्रा एका वयोवृद्धाची हत्या होणे या मागच नेमक कारण काय ? अध्याप स्पष्ट झाले नाही. अधीक तपास पोलिस करीत आहेत.

Previous Post Next Post