पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या हस्ते नागभीड येथे भवानी बिकानेर मीठाईवाला चे उद्घाटना संपन्न.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड येथे राम मंदीर चौकात असलेल्या राजपुरोहीत बंधुची नावजलेली जय अंबे राजस्थान स्वीट मार्ट ची दुसरी ब्रांच भवानी बिकानेर मिठाईवाला पोलिस स्टेशन जवळ भेंडारकर काॅम्प्लेक्स,ब्रम्हपुरी रोड नागभीड येथे सुरु करण्यात आली. सदर बिकानेरचे उद्घाटन पोलिस निरीक्षक योगेश घारे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर उद्घाटन प्रसंगी फोडावयाचा नारळ हा पोलिस निरीक्षक योगेश घारे यांनी स्वता न फोडता उपस्थीत महाविद्यालयातील तरुणींना फोडण्यास पुढे केले.
भवानी स्वीट मार्ट चे प्रो.प्रा भवानीसींग यांनी सांगीतले की जुनाबस स्थानक परीसरातील नागरीकांना आमची मुख्य ब्रांच जय अंबे राजस्थान स्वीट मार्ट हे दुर पळत होती ग्राहकांच्या आग्रहास्तव आम्ही भवानी बिकानेर मिठाईवाला नावाने नवी बिकानेर सुरु केले आहे. जुना बस स्थानक परीसरातील नागरीकांना,ग्राहकांना आता सोईचे ठरनार आहे. असे हि भवानीसींग राजपुरोहीत यांनी सांगीतले.
या वेळेस माकोडे मेजर, पोलिस विभागाचे अजीत,रोहीत,पीएसआ संजय पोंदे, वाहतुक विभागाचे क्रुनाल पतरंगे, अर्जुन राजपुरहीत,श्रवन राजपुरोहीत,ॲड.भंडारकर,उमेशसींग, मदनसींग, ज्योतीसींग राजपुरोहीत,जयसींग रेल्वे पोलिस विभाग,भोप्पतसींग राजपुरोहीत सह असंख्य नागरीक व ग्राहकवर्ग उपस्थीत होते.




