ITI शिक्षकांच्या शैक्षणिक अहर्ता मध्ये घोळ - अर्जुन शंकर जाधव, CITS प्रशिक्षणार्थी
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
ज्या प्रकारे प्राथमिक व अन्य विद्यालयावर शिक्षकांसाठी Dted व Bed हा कोर्स अनिवार्य आहे,त्याच प्रमाणे फक्त ITI शिल्पनिदेशकासाठी च (शिक्षक) CITS (Craftsman Instructor Training Schem) हा कोर्स काढलेला आहे,माझ्या सारख्या लाखो विध्यार्थ्यांनि हा कोर्स केलेला आहे, तर मग हा कोर्स (CITS) सुद्धा अनिवार्य करायला पाहिजे.
मा. प्रधानमंत्री महोदय व भारत सरकारच्या सौजन्याने SKILL INDIA या योजनेअंतर्गत भारताला SKILLING सेक्टर मध्ये परिपूर्ण करायचं आहे, तर iti सेक्टर मध्ये NON SKILLED शिल्पनिदेशक (शिक्षक) का?
UNSKILLED शिल्पनिदेशक (शिक्षक) पदभरती झाल्यावर विद्यार्थी पण UNSKILLED च तयार होतील,मग SKILL INDIA हा जो मा. प्रधानमंत्री महोदय व भारत सरकारचा उपक्रम आहे,तो सर्वस्वी DVET व DGT ला अमान्य आहे का? असा सुद्धा संभ्रम आमच्या सारख्या CITS प्रशिक्षणार्थ्यांना पडतो.
बाकी राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात पण CITS अनिवार्य करायला हवे,असे सध्या महाराष्ट्रात होताना दिसत नाही,म्हणजे मा.प्रधानमंत्री महोदयांचा स्वप्न SKILL INDIA चा आहे, तो महाराष्ट्र सरकारला अमान्य आहे का?असा ही संभ्रम युवकांमध्ये आहे.
2017 मध्ये DVET ला कोर्टाने आदेश दिले होते की,40 ते 50 वर्षांपूर्वीच्या RR (Recruitment Rule) मध्ये बदल करून पदभरती घ्या DVET (Director vocational Education Training) कडून सध्या असे होताना दिसत नाही.
2022 च्या 1457 रिक्तपदाच्या जाहिराती मध्ये CITS शिल्पनिदेशकाना ( शिक्षक ) प्राधान्य राहील असे नमूद केलेले आहेत त्या नुसारच CITS बांधवांना न्याय मिळाला पाहिजे हीच मागणी CITS शिल्पनिदेशक प्रशिक्षित संघ महाराष्ट्र करत आहे.

