Top News

According to the traditions of the Banjara community in the village of Pathrad Devi, Tij festival is celebrated in grand style!

पाथ्रड देवी गावात बंजारा समाजाच्या वतिने परंपरे नुसार तिज उत्सव थाटात साजरा !



 विदर्भ माझा न्युज 24 - दारव्हा 

दारव्हा तालुक्यातील पाथ्रड देवी गावात बंजारा समाजाच्या वतीने पारंपारिक तिज उत्सव थाटात साजरी करण्यात आले यावेळी बंजारा समाजातील अविवाहित मुलींसाठी सर्वात   मोठा सण म्हणजे तीज उत्सव आहे.बंजारा समाजातील अनेक उत्सवापैकी दहा दिवस चालणारा उत्सव म्हणजे तिजोत्सव आहे.या उत्सवाची सुरुवात रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे नारळी पौर्णिमेला सुरू होते.

बंजारा समाजाच्या रितीरीवाजा प्रमाणे तांड्यातील सर्व तांड्यातील अविवाहित मुलीला बांबूच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या टोपल्या (डुरडी) घेऊन अविवाहित,माता भगिनी  नायकाच्या घरासमोर किंवा तांड्यातील सेवालाल मंदिरासमोर हा तिज जवारा पेरल्या जातो. 



बंजारा बोलीभाषेत गावातील अविवाहित मुली आणि माता भगिनी नाईक,नाईकन यांचे वर्णन करीत डफड्याच्या तालेवर नाचत गाजत मुंगळ्याची माती घ्यायला जातात जातावेळेस भिजवलेले चणे मुली सोबत घेऊन जातात आणि बोरीच्या झाडाला ते चने त्यांच्या काट्यामध्ये रोपवून पुजा करुन प्रदक्षिणा टाकून नाईकांच्या घरी माती घेऊन येतात.आणि संध्याकाळी प्रत्येकांच्या टोपलीत माती आणि भिजवलेले गहू शिंपून तिजोत्सवाचा पहिला दिवस साजरा करण्यात येतो.हा तिज (जवारा) उत्सव दहा दिवस चालतो सकाळ,संध्याकाळ मुली एकत्र येऊन   विहिरी वरून पाणी आणून गाने म्हणून प्रत्येकांच्या घरी जाऊन पाणी टाकतात.तिज जवाराच्या नवव्या दिवशी ढंबोळीचा कार्यक्रम असतो ढंबोळी म्हणजे जाचे त्यांच्या घरी त्या टोपलीची गुळ पोळी एकत्र बनवून नैवेद्य दाखवून पुजा केली जाते.आणि सकाळी ,नाईकांच्या घरी सर्व एकत्र येऊन दिवसभर बंजारा बोलीभाषेत गीत गातात, भाऊ भावाला बहीण म्हणते की पाठ देऊन टाक हे पाट एका छोट्या लाकडापासून तयार केलेला असतो म्हणून या तिज जवारा उत्सवाला या पाटाचा खुप महत्व असतो.

तिज टोडनीच्या दिवसी मुंगळ्या शेतातील काढलेली माती दहाव्या दिवशी आणून त्यापासून गण गौरी,गण गौरा तयार करून  महीला,मुली पुजा करुन दिवसभर तेथे बंजारा समाजातील वेषभुषेत गाने न्यृत्य करतात.संध्याकाळ झाली तर आप,आपल्या टोपली व द्रोण घेऊन गावात मिरवणूक काढून नाल्यावर सेवालाल महाराज,जगदंबा देवीची आरती करून प्रसाद वाटून तिज जवारा व गण गौरी,गण गौराचा विसर्जन करून येतात म्हणून बंजारा समाजातील सर्वात मानणारा सण म्हणजे तीज उत्सव हे आहे या सणाला समाजाच्या वतिने खुप महत्व असतो. हा बंजारा समाजाच्या रीतीरीवाजाप्रमाणे  तालुक्यातील पाथ्रड देवी गावात तिज जवारा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नायक कारभारी डायसाळ समस्त गावकरी मंडळीं माता भगिनी अविवाहित मुली अतिशय आनंदाने सहभागी झाले होते.

Previous Post Next Post