Top News

Vidarbha Maja News 24's news bang....Power distribution center woke up....

विदर्भ माझा न्युज 24 च्या बातमी चा दनका....विज वितरण केंद्राला आली जाग....


शेतातील विज बिल न भरल्यास जडालेला ट्रान्सफाॅर्मर लावून देण्यास दिला होता नकार......


मूल येथील विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंतांनी बातमी प्रकाशीत होताच बदलुन दिले ट्रान्सफाॅर्मर....


शेतकर्यांनी मानले आभार.... 



  विदर्भ माझा न्युज 24 - मुल  


मुल येथील अंतरगाव परडवाही शेती शिवारातील ट्रान्सफॉर्मर वर विज पडून सदर ट्रान्सफॉर्मर बंद पडलेले होते. मुल शहर येथील विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता यांना काही शेतकरी वर्ग निवेदन देण्याकरिता गेले असता त्यांनी त्यांना विजेचे पूर्ण बिल भरल्याशिव्याय ट्रान्सफॉर्मर बसवून देणार नाही असे ठनकाऊन सांगीतल्याची माहीती शेतकर्यांनी विदर्भ माझा न्युज 24 चे प्रतिनिधी संदिप तेलंग यांच्या  सोबत बोलतांना  दिली होती.

त्या संबंधीत विदर्भ माझा न्युज 24 ने बातमी प्रकाशीत करताच  विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता यांनी तात्काळ ट्रान्सफॉर्मर बदलुन दिले आहे.

शेतकर्यांनी मुल विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता,जिल्हाचे पालकमंत्री तथा बातमी प्रकाशीत करून न्याय मिळवून दिल्या बद्दल विदर्भ माझा न्युज 24 आभार व्यक्त केले.

Previous Post Next Post