सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथे पालक शिक्षक सभा संपन्न.....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोज गुरुवार ला सर्वोदय विद्यालय बल्हारशाह येथे पालक-शिक्षक सभा संपन्न झाली, सदर सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर वैद्य हे उपस्थित होते, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका गजभे मॅडम, दुपारपाळी प्रमुख जांभुळे सर, ज्येष्ठ शिक्षक वटाणे सर हे उपस्थित होते आणि पालक वर्ग,शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
इयत्ता दहावीचा निकाल आणि शाळेची प्रगती याबाबत घुगुल सर यांनी सांगितलं तसेच शाळेत घेण्यात येणारे उपक्रम याबद्दल सोनवाणे सर यांनी सविस्तर माहिती दिली तसेच विद्यार्थांच्या गुणवत्ता विकासात पालकांची भूमिका या बद्दल मारपल्लीवार सर यांनी माहिती दिली,
सभेचे अध्यक्ष प्रभाकर वैद्य यांनी पालकांची भूमिका मांडून सभेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ घुगुल मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन सौ.बुटले मॅडम यांनी केले.



