वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी दुर्गापुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल......
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर )
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर या वनविभागा अंतर्गत मोहर्ली (प्रादे.) परिक्षेत्रात दिनांक- 08/08/2023 रोजी सायंकाळी 8.00 वाजताचे दरम्यान 1) वासुदेव ठाकरे, रा. भद्रावती, 2) अक्षय बंडावार, रा. भद्रावती व 3) सुबोध तिवारी, रा. माजरी, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर हे अडेगाव गावामध्ये लाल रंगाच्या गाडीवर आले असून जंगलाच्या दिशेने जात होते. त्यावेळी वनकर्मचारी यांनी सदर इसमांना जंगल परिसरात फिरण्यास मनाई केली व आगरझरी मार्गे बाहेर निघण्यास सांगितले. तेव्हा आम्हाला वनाच्या बाहेर काढले म्हणून रात्री 10.39 वाजता मोबाईलवर संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादे.) यांना शिवीगाळ केल्याने भारतीय दंड सहितेच्या 1860, कलम- 186, 504, 507 नुसार पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे गुन्हा क्र. 0441/2023, दिनांक 09/08/2023 अन्वये दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास कुशाग्र पाठक, उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली (प्रादे.) चौकशी करीत आहे.
