मुख्याधिकार्यांकडे संभाजी ब्रिगेड बल्हारशाह ची मागणी.....
बल्हारशाह शहरातील प्रभाग क्र. १२ अंतर्गत येणारे शिवाजी वार्ड चे नामांतर करून आदरपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज वार्ड असे नमुद करा....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जनसामान्य लोकांमध्ये आदर व सन्मान आहे. हीच बाब लक्षात घेऊन, बल्हारशाह शहरातील प्रभाग क्र.१२ अंतर्गत येणारे शिवाजी वार्ड चे नामांतर आदरपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज वार्ड करण्यात यावे. यासाठी स्थानिक पातळीवर ठराव मंजूर करावे, याकरीता संभाजी ब्रिगेड बल्हारशाह तर्फे नगर परीषद बल्हारशाह चे मुख्याधिकारी विशाल वाघ यांची आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी संभाजी ब्रीगेड च्या शिष्टमंडळानी भेट घेऊन सवीस्तर चर्चा केली व निवेदन दिले.या वेळी साहिल घिवे, संकेत चौधरी, निखिल वडस्कर, निलेश सुर, अनिकेत गजभिये, शुभम मानकर उपस्थित होते.
