Top News

The bus driver accused of molesting a 9-year-old student of a prestigious school in Balharshah city was handcuffed by the police.

बल्हारशाह शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेतील 9 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्या आरोपी बस चालकास पोलिसांनी ठोकल्या बेळ्या.....


विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

बल्हारशाह शहरातील एका प्रतिष्ठीत शाळेतील 62 वर्षीय विद्यार्थी वाहतुक करणार्या बस चालकाने एका 9 वर्षीय चिमुकल्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना काल दि.१ ऑगस्ट २०२३ ला घडली. विद्यार्थी आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 354 आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे.

 मो. अजीज मो. मजहर शेख असे आरोपीचे नाव असून तो पंडित दीनदयाळ वॉर्डातील रहिवासी आहे. सूत्रानुसार, सोमवारी सकाळी शाळेत बस चालक आरोपीने इयत्ता

चौथी त शिकणाऱ्या 9 वर्षीय विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला विद्यार्थीनींच्या कुटुंबीयांनी त्वरीत  बल्हारशाह पोलिस स्टेशन गाढत बसचालका विरुद्ध तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

पुढील तपास बल्हारशाह पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नेहा सोळंकी करत आहेत. संबंधित शाळा व्यवस्थापनाने सदर घटना निंदनीय असून आरोपी बसचालकाला सेवेतून बडतर्फ केले असल्याचे स्पष्ट केले आहे.

Previous Post Next Post