वस्ती विभाग व डेपो विभागाला जोडण्यासाठी उडान पुलाची निर्मीती करा...पुरामूळे बल्हारशाह शहरातील नागरिकांना रहदारीस करावा लागतो त्रास सहन - विष्णू बुजुने, चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, मनसे
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील वस्ती विभागा अंतर्गत वर्धा नदी आहे, मात्र पावसाळ्यात नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने मोठा प्रमानात पूरचा फटका परीसरातील नागरीकांना सहन करावा लागतो, वस्ती विभाग, टेकडी विभाग,डेपो विभाग यांना जोडणारा गोल पुलीया मध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमानात साचते त्या मुळे वस्ती विभागाचा डेपो विभाग व टेकडी विभागाशी संपर्क तुटतो.
वस्ती विभाग ते बसस्थानक, शासकीय रुग्णालय, नगरपरीषद विभाग, बस स्थानक व वस्ती इतर ठिकाणी वस्ती विभागातुन जाणारी वाहतूक ठप्प होते. त्यामुळे विद्यार्थी,विद्याल व महाविद्यालयीन कर्मचारी व आजारी व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत असून, विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेस जर गोल पुलीया तुडुंब भरला असला तर परीक्षेला जाणे शक्य होत नसल्याने रहदारीस अळथडा निर्माण होते.
ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बुजोने यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना पर्यायी मार्ग काढावा, अन्यथा दोन्ही तीन्ही विभागाला जोडणारा उडान पुल बांधण्यात यावा असे निवेदनात म्हटले. वस्ती विभाग ते डेपो विभागाला जोळनारा ऊडान पुल बांधल्यास पुर परीस्थीती बल्हारशाह शहरातील जनतेला रहदारीच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. त्या करीता लवकरात लवकर या बाडतीत तोडगा काठुन उडान पुलाची निर्मीती करण्यात यावी अशी मागणी निवेदना मार्फत मनसे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बुजोने यांनी निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
निवेदन सुपूर्द करताना मनसेचे तालुका अध्यक्ष गोपाल मोहुर्ले, शहर अध्यक्ष उमेश कुंडले, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष केतन तगराम ,योगेश गोरडवार, यांच्यासह मनसे व मनविसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
