Top News

Grand opening of exhibition and sale of books on the occasion of World Marathi Language Day.....

जागतिक मराठी भाषा दिना निमीत्य ग्रंथ प्रदर्शनीचे व विक्रीचे थाटात उद्घाटन.....


 विदर्भ माझा न्युज 24 - झरी 



         पोवाडा, गणगवळण, चरित्र, कादंबरी,प्रवास वर्णन, क्रांती गीत अशा अनेक साहित्य प्रकारामध्ये लिखाण करणारे व साहित्यावर आपली वेगळी ओळख निर्माण करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अनेक साहित्य कृतीवर चित्रपट आलेले आहे, त्याचप्रमाणे अनेक क्रांतिकारक होण्यासाठी लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचा आधार घेत आपली घोषणा ठरवीले. अशा या लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचा 1 ऑगस्ट हा जन्मदिवस संपूर्ण भारत वर्षामध्ये जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येते.

या सर्व उपक्रमाचा भाग म्हणून वणी शहरात अण्णाभाऊ साठे लिखित ग्रंथाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनी आणि विक्रीचे आज दिनांक 1 ऑगस्ट सकाळी 9:00 वाजता थाटात उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटकीय कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय अंबादास वागदरकर तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ वणी हे होते, तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक बाळकृष्ण राजुरकर अध्यक्ष क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक सार्वजनिक वाचनालय वणी हे तर  राजेंद्र देवडे सामाजिक कार्यकर्ता वणी हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होते. 

सदर प्रदर्शनी व विक्री पुढील सहा दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात सुरू राहतील साहित्यप्रेमी जनतेने या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विवेक निब्रड, निखिल दुर्गेकर, अक्षय मालेकर,बादल आस्वले, ऋषी बोरुले, अक्षय मारेकर इत्यादींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली कोगरे यांनी तर आभार संजय गोडे यांनी मानले.

Previous Post Next Post