बल्हारशाह शहरात श्रीराम वार्ड इथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरात दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त श्रीराम वार्ड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला माल्य अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली व आपण सगळे मिळून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार पुढे नेऊ असे आत्मसात करण्यात आले, तसेच नागरिकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली या कार्यक्रमाचे पुर्ण नियोजन सामाजीक कार्यकर्ते मंगेश बावणे यांनी केले .
या वेळी नरेश डोंगरे, गणेश वानखेडे, गणेश आमटे, बंटी डोंगरे, दिलीप आमटे, शिवम डोंगरे ,गणेश डोंगरे, सतीश, ज्ञानेश्वर, प्रथम, रोहित ,प्रवीण,आदू,आकाश, सीता डोंगरे, लता डोंगरे, सीमा आमटे, अंजू आमटे या सह वार्डातील अनेक नागरीक उपस्थित होते !

