विसापूर येथील टोल नाका त्वरीत बंद करा - प्रशांत झांमरे, अध्यक्ष भारतीय युथ टायगर संघटना,विदर्भ
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना निवेदना मार्फत मागनी......
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
चंद्रपूर बल्हारशाह मार्गावर असलेला विसापूर येथील टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी निवेदना मार्फत भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना करण्यात आली.
विसापूर टोलनाक्याच्या जो टोल आहे तो अवैधरीत्या सुरू आहे कारण हा टोल नाका चंद्रपूर ते बामणी या मार्गाचा टोल वसूली करीत आहे हा रोड फार मोठ्या प्रमाणामध्ये खराब होत असतो या रोडावरती फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असतात या रोडचा मेंटेनन्स टोलनाक्याकडून करण्यात येत नाही, त्यामुळे या मार्गावर फार मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत बरेचसे निष्पाप लोकांना रोड अपघातात जीव सुद्धा गमवावा लागला आहे.
या टोलनाक्याचे मालक रोडचे मेंटेनन्स करण्यास अक्षम ठरत आहेत म्हणून हा टोल नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी भारतीय युथ टायगर संघटनेच्या वतीने करण्यात आली. सदर मागणी चे निवेदन देतांना भारतीय युथ टायगर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत झांमरे, दर्शन मोरे, रतन फुलकर, सुरज चौबे, माजी नगरसेवक स्वामी रायबरम सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
