Top News

The administration's attempt to suppress the Ardha Jalasamadhi movement.....The protesters blocked the road for two hours...... Deputy Chief Minister Ajit Pawar met with the statement. Nagbhid, Bramhpuri, Sindevahi, Sawli talukas should not be included in Chimur Upper Collectorate...Demand of protestors....

अर्ध जलसमाधी आंदोलन दळपन्याचा प्रशासनाचा प्रयत्न.....आंदोलकांनी रोखुन धरला दोन तास रस्ता......


उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची प्रत्यश भेट घेऊन दिले निवेदन.....


चिमुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात नागभिड, ब्रम्हपूरी,सिन्देवाही, सावली या तालुक्यांचा समावेश करू नये...आंदोलकांची मागणी....


 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड  

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड ब्रम्हपूरी सिन्देवाही सावली या तालुक्याचा शासनाने नुकताच चिमुर जिल्हाधिकारी कार्यालयाल क्षेत्रात समावेश केल्याने त्यांच्या विरोधात आज घोडाझरी तलावामध्ये जलसमाधी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान आज दुपारी १२:०० वाजता पासुन आंदोलन कर्ते घोडाझरी तलावांच्या मुख्य प्रवेश व्दाराजवळ एकत्र आले. 



मात्र या आंदोलनाला पोलिस प्रशान व तहसिल प्रशाशनाने नागभिड- तळोधी या प्रमुख महामार्गावर असलेल्या घोडाझरीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन रोखून धरल्याने येथे काही वेळ तनावाचे वातावरण निर्मान झाले होता. मात्र आंदोलक प्रशासनाला जुमानत नव्हते.


आणी शेवटी आंदोलकानी आक्रमक भुमिका घेवून प्रशाशनाच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करत दोन तास रास्ता रोको आंदोलन केले यामुळे वाहतूक एक किलोमिटर पर्यंत ठप्प पडली होती. या वेळी प्रशाशन मुर्दा बाद चे चे नारे देऊन स्थानीक आमदारांचा ही निषेध करण्यात आला.


या आंदोलनामध्ये तिन्ही तालुक्यातील सष़र्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस विभागाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. नागभीडचे तहसिलदार यांना यावेळी निवेदन देऊन या आंदोलनाची सांगता करण्यांत आली.

मंत्रालयात जाऊन दिले निवेदन......

 तर या संदर्भात नागभिड जिल्हा निर्मीती कूती समितीच्या काही पदाधिकार्यांनी यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष भेटून चिमुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात या तालुक्यांचा समावेश करू नये अश्या प्रकारची निवेदनाद्वारे मागणी केली.

Previous Post Next Post