बामणवाडा येथील श्वेता वाघमारे हिची BSF मध्ये निवड....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
मनात जिद्द आणि चिकाटी असेल तरच जीवनात कोणतेही यश तुम्ही मिळवू शकता. याचेच उदाहरण बामणवाडा मध्ये दिसून आले आहे. कु. श्वेता बंडु वाघमारे - वडीलांकडे अत्यल्प उत्पन्न त्यातून येणाऱ्या पैशातून घर, शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी होणारी आईवडिलांची धडपड हे सर्व बघवत नव्हते. हि परिस्थिती बदलावयाची असेल तर आपल्याला अभ्यास करून मोठे व्हावे लागेल अशी जिद्द, चिकाटी अन कठोर मेहनत उराशी बाळगून राजुरा शहरातील बामणवाडा येथील बंडू अर्जुन वाघमारे यांच्या हरहुन्नरी लेकीने एस एस सी विभागाच्या शिपाई जी.डी (बॉर्डर सुरक्षा बल) पदाची परीक्षा दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण होत आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्याच्या या यशामुळे आईवडिलांचा उर भरून आला असून आयुष्य सार्थकी लागल्याचे ते मोठ्या भावनेने सांगत आहे.
राजुरा शहरात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे समाजाच्या विविध स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. या यशानंतर बामणवाडा परिसरातील शेकडो नागरिकांनी त्यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या.

