नगर पंचायत सावली तर्फे स्वर्गरथ" सेवा निशुल्क...नगर उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांचा पुढाकार....
वॉर्ड क्र.१३ मधील सर्व नागरिकांचे नव्या नळ कनेक्शन योजने अंतर्गत स्वतः ५०० रुपये कर भरणार....
सावली शहरातील नागरिकांना १००% नवे नळ कनेक्शनचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी केले आवाहन....
विदर्भ माझा न्युज 24 - सावली
राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार विजय वडेट्टीवार यांनी अंगी जोपासलेले " जनसेवा हिच ईश्वरसेवा" हे व्रत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रामाणिकपणे पार पाडत असतात. नुकतेच नगर पंचायत सिंदेवाही तर्फे स्वर्गरथ मोफत देण्याचा सेवाभावी निर्णय नगरपंचायत सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी घेतला, त्यांचा या सेवाभावी निर्णयायचे स्वागत करीत ,सावली शहरातील कुणाच्याही घरी आकस्मिक असो वा आजारपणामुळे असो किंवा कोणत्याही कारणाने व्यक्तीचा मृत्यू झाल्यास नगर पंचायत सावलीतर्फे "स्वर्गरथ" सुविधा मोफत देण्याचा निर्णय नगरउपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांनी घेतला आहे.
'स्वर्गरथा' साठी यापुढे कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे यापूर्वी स्वर्गरथाकरिता नगर पंचायत सावलीतर्फे ५०० रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते.मात्र यापुढे स्वर्गरथाकरिता कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. स्वर्गरथासाठी लागणारा खर्च दिनांक २३/०८/२०२३ पासून तर ते नगरउपाध्यक्ष पदावर असे पर्यंत स्वतः संदीप पुण्यपकार करणार आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व नगरसेवकांनी स्वागत केले आहे.
तसेच ४ महिन्यापासून सावली शहरात जे नवे नळ कनेक्शन योजना सुरु आहे त्याची गती मंदावली असून उपनगराध्यक्ष या नात्याने त्यांनी सावली नगर पंचायतीतर्फे लवकरात लवकर सावली शहरातील नागरिकांनी १००% नळ कनेक्शनचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी नगर पंचायत सावलीला सहकार्य करावे असे सावली शहरातील सर्व जनतेला आवाहन केले आहे.
जेवापासून सावली शहरात नवीन नळ कनेक्शन लावण्याचे काम सुरु झाले आहे तेवा पासून नगरउपाध्यक्ष संदीप पुण्यपकार यांच्या वॉर्ड क्र.१३ मधील ५०० रुपये पाणी कर स्वरूपात ते भरत आहेत, तरी सुद्धा नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असून १०० % उदिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता आपल्या वॉर्ड क्र.१३ मधील सर्व नागरिकांचे नव्या नळ कनेक्शन योजने अंतर्गत स्वतः ५०० रुपये कर भरणार आहेत यामुळे नागरिकांना महागाईच्या काळात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले, या निर्णयामुळे त्यांचे सर्व स्तरावर कौतुक केल्या जात आहे.

