नागभीड जिल्हा निर्मीती करीता प्रतिष्ठीत महीलांसह अनेक नागरीकांनी केले मुंडन आंदोलन.....
जन भावनेचा विचार न करून,या आंदोलनाकडे लक्ष न देणं, हे या सरकार ला भोगावे लागेल - विजय वड्डेटीवार,वीरोधी पक्ष नेता,विधानसभा.
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड जिल्हा निर्मीती कृति समीती तर्फे चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट होण्यासाठी विरोध करून १६ ऑगस्ट बुधवार ला मुंडन आंदोलन करण्यात आले यात प्रतिष्ठित महिलां सह शेकडो नागरिकांनी मुंडण करून चिमुर विरोधात आक्रोश पुकारला.
कोणतीही पूर्व सूचना न देता शासनाने चिमूर येथे अप्पर जिल्हाधीकारी कार्यालय सुरू केले आहे, आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळा सुद्धा केला आहे. शासनाच्या या निर्णया विरोधात तिन्ही तालुक्यातील जनते कडून तीव्र विरोध करून विविध रूपाचे आंदोलन सुरू आहेत.
परंतु सरकार अजूनही यांची गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे, हि आंदोलने पुन्हा पेटून ऊठुन आज मुंडण आंदोलन करण्यात आले. यात दोन प्रतिष्ठित महिलांनी सुद्धा आपली केसे कापून मुंडण करून चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया विरोधात आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेकडो नागरिकांनी आपले केस कापून मुंडण केल. या आंदोलनाला राज्यातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, व नामदेव किरसान प्रदेश काँग्रेस सचिव, यांनी भेट घेऊन आंदोलकांना मार्गदर्शन केले.
कोणत्याही परिस्थितीमध्ये नागभीड ब्रह्मपुरी आणि सिंदेवाही हे तीन तालुके चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातून वगळण्यासाठी मी जीवाचा रान करेल आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील. नागभीड जिल्हा निर्मीती कृती समितीच्या वतीने जलसमाधी आंदोलन घोडाझरीला झाला आज या ठिकाणी मुंडन आंदोलन होत आहे. या आंदोलनात प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. या सरकारने लक्षात घ्यायला पाहिजेत जर आम्ही आंदोलन करून आमच्या डोक्यावरचे केस काढू शकतो तर आम्ही तुमच्या डोक्यावरचे केस ऊपडू ही शकतो. या तिन्ही तालुक्यातील हा निषेधाचा पवित्रा हा काही छोटा नाही आहे, या आंदोलनाला दुर्लक्ष करणं , या आंदोलनाला दृश्य लेखनं जन भावनेचा विचार न करून,या आंदोलनाकडे लक्ष न देणं, हे त्यांना भोगावे लागेल, या रास्त मागणीसाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहो. - विजय वडेट्टीवार,विरोधी पक्षनेते विधानसभा
सध्या चिमूर अप्पर कार्यालयातून नागभीड तालुका सिंदेवाही तालुका व ब्रह्मपुरी तालुका वगळण्यात यावा या मागणीने नागरिक कृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलन सुरू आहेत,आपण सुद्धा या आंदोलनात सहभागी होऊन केस देण्याचे ठरविले. कारण जेव्हा मी सेवेत असताना चिमूर येथे कार्यालयीन कामासाठी गेलो असता त्या ठिकाणी कामाची पद्धत व जाण्यासाठी व येण्यासाठी खूप मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. तेव्हापासून मनात निर्धार घेतला की चिमूरला कधी येऊ नये काम कोणाचा पडू नये. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय घोषित करून आम्ही मुंडन करून तीव्र निषेध करतो. - निर्मला कवळू नवघडे, नवेगाव पांडव माजी अंगणवाडी सेविका



