Top News

Balharshah Paper Meal employee died on the spot in Maharaja Travels' horrific accident..... Maharaja Travels hit a vertical tanker.....

महाराजा ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात बल्हारशाह पेपर मील कर्मचार्याचा जागीच मृत्यु.....


महाराजा ट्रॅव्हल्सची उभ्या टँकरला दिली धडक.....




 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

आज सकाळच्या सुमारास पालगाव- राजुरा- बल्हारशाह - चंद्रपूर मार्गे नागपूरला जाणाऱ्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या खाजगी बस क्रमांक Mh 34 BZ 0009 ला वर्धा जिल्ह्यातील जाम जवळील कांधाली जवळ भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे.

सदर अपघातात एक जण जागीच ठार झाला असून चालक वाहकासह 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमीक माहीती आहे.

माहितीनुसार मृतकाचे नाव धीरज कुळकर्णी (वर48) वर्ष रा. न्यू कॉलनी पेपर मिलचे रहिवासी असून ते बिल्ट मध्ये कार्यरत होते. गंभीर जखमी अवस्थेतील चालक, वाहक व प्रवाशांना नागपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत असुन किरकोळ जखमी प्रवाशांना स्थानिक रुग्णालयात प्राथमिक तपासणी व उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

Previous Post Next Post