जागतिक फोटोग्राफी दिवसानिमित्य आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गिरवले फोटोग्राफीचे धडे......
स्थानिक फोटोग्राफरच्या पुढाकाराने नव्या उपक्रमाची सुरुवात.....
विदर्भ माझा न्युज 24 - वरोरा /आनंदवन :
जागतिक फोटोग्राफी दिवस ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने उत्साहाने साजरा केला गेला. याच दिनाचे औचित्य साधून वरोऱ्यातील स्थानिक फोटोग्राफर्सनी आनंदवनातील दिव्यांग विद्यार्थांना फोटोग्राफीबद्दल मार्गदर्शन करत एका नव्या उपक्रमाला चालना दिली.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमासाठी स्थानिक फोटोग्राफर हेमंत ऐकरे, रुपेश ऊगे, अक्षय अंड्रस्कर, प्रज्वल ऐकरे,अजय थाटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी त्यांनी दिव्यांग विद्यार्थांना फोटोगाफीबद्दल प्राथमिक माहिती, फोटोग्राफीतील संधी, फोटोग्राफीकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि फोटोग्राफीसमोरील
आव्हानं याबद्दल मार्गदर्शन केलं. फोटोग्राफी हे क्षेत्र फक्त काही लोकांसाठी मर्यादीत नसून स्त्री, पुरुष, दिव्यांग आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी आहे.आणि फोटोग्राफीमध्ये करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. असं मार्गदर्शन प्रोफेशनल फोटोग्राफर हेमंत ऐकरे, रुपेश उगे आणि अक्षय अंड्रस्कर यांनी केले.
यावेळी फोटोग्राफी शिकण्यासाठी दिव्यांग विद्यार्थांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. त्यातील अनेक विद्यार्थांनी फोटोग्राफी शिकण्याची इच्छा व्यक्त केली असता, स्थानिक फोटोग्राफअर्सनी व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांशी चर्चा करून फोटोग्राफी शिकवू अशी ग्वाही दिली. यावेळी कार्यंक्रमला दिव्यांग विद्यार्थांसह व्यवस्थापकिय अध्यक्ष रविंद्र नलगिंटवार , निरिक्षक गिरिधर मसराम निर्देशक महेश भगत , निर्देशक अश्विनी आंधळकर मॅडम उपस्थित होते.

