अन कार चक्क 20 फुट हवेत.....भिकेश्वर फाट्यावर कार व दुचाकीचा विचीत्र अपघात......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड - ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्गावरील नागभीड पासुन अवघ्या 5 की.मी. अंतरावर असलेल्या भिकेश्वर फाट्यावर गुरुवार दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
महिलाचालक असलेल्या एका कारने दुचाकीला ठोस मारून हवेत 20 फूट कार उसळली आणी रोड च्या कडेला असलेल्या घराला जोरदार धडक दिली.
सदर कारमधील कुणालाही इजा झाली नाही. मात्र दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. ढेबू दयाराम कुत्तरमारे (वय 42) असे जखमीचे नाव आहे.
नागपूर येथील तीन महिला MH 31 BK 5311 क्रमांकाच्या कारने ब्रह्मपुरीला जात होत्या. भरधाव कारने दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे याला भिकेश्वर फाट्यावर धडक दिली. या अपघाताने महिला कारचालक चांगलीच गोंधळली आणि या गोंधळात कारवरील नियंत्रण सुटले. ही कार चक्क 20 फूट अंतरावर असलेल्या एका घराच्या सज्जाला आदळून खाली अंगणात पडली. अंगणात कुणी नसल्याने तर मोठा अनर्थ टळला.
दुचाकीस्वार ढेबू कुत्तरमारे यांना ब्रह्मपुरी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले आहे. नागभीड पोलिसांनी अपघातग्रस्त गाडी कार पोलिस स्टेशन ला जमा केली असुन पूढील तपास नागभीड पोलिस करीत आहेत.
