Top News

Only the farmer knows the problem of the farmers. Chilli plants are being bought and sold through WhatsApp!

शेतकऱ्यांची अडचण जाणतो शेतकरीच.......


व्हॉट्सॲप द्वारे होत आहे मिरचीच्या रोपांची खरेदी - विक्री !


  विदर्भ माझा न्युज 24 -  कोरपना  


             चंद्रपूर जिल्ह्यात मिरची पिकाच्या लागवडी कडे शेतकऱ्यांचा मोठा कल दिसत आहे.मिरचीला मिळणारा बाजारभाव व भरघोस मिळणारे उत्पन्न यामुळे  चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हा मिरची पिकाकडे वळला आहे. त्यातच मिरची ची लागवड करीत असताना रोपांची मोठी समस्या निर्माण होत असते काही शेतकऱ्यांना रोप अपुरे पडत असते तर काहींचे रोप शिल्लक राहत असते.



 शिल्लक रोप विक्रीसाठी शेतकरी व्हॉट्सॲप चा आधार घेऊन मिरची रोपांची खरेदी विक्री करीत आहे . यामुळे ज्या शेतकऱ्याला रोप पाहिजे आहे त्याला आपल्याला पाहिजे त्या व्हेरायटीचे रोप कोणत्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे याची माहिती मिळत असते.

शेतकरी हा शेतकऱ्यांच्या मदतीला येत असून विक्री करणारा व खरेदी करणारा शेतकरी एकमेकांना सहकार्याची भावना निर्माण होताना दिसत आहे.



  

Previous Post Next Post