सुमित गेडाम मृत्युप्रकरणी होणार चौकशी, डॉ .महादेव चिंचोले जिल्हा शल्क चिकीस्तक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी मृतकांचा नातेवाईकांना दिले आश्वासन....
शासनाने १०० खाटाचा रुग्णालयास मान्यता दिली परंतु डॉक्टर अभावी रुग्णालय पूर्ण होणार का?
नागरिकांमध्ये झाली निर्माण शंका विशंका...
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या सुमित गेडाम मृत्यू प्रकरणी . पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेतली असून सुमित गेडाम मृत्यु प्रकरणी डॉ .महादेव चिंचोले जिल्हा शल्क चिकीस्तक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांनी मूल उपजिल्हा रुग्णालय येथे येऊन मृतकांचा नातेवाईकांना सोबत व आमदार प्रतिनिधी चंद्रकांत आस्टनकर यांना चौकशी करून दोषी डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिलेले आहे.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने उपजिल्हा मूल येथे 50 खाटाचा रुग्णालय हा 100 खाटांचा करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. परंतु डॉक्टर अभावी हे रुग्णालय पूर्णत्वास येणार का लोकांमध्ये शंका कुशंका निर्माण झालेली आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यांचा कल खाजगी रुग्णालयाकडे जास्त असल्यामुळे सरकारी रुग्णालयात दुर्लक्ष होत असल्याची चर्चा जनतेमध्ये सध्या मूल शहरात सुरू आहे. उपजिल्हा मूल रुग्णालय येथे पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे सरकारी दवाखाना सध्या रामभरोसेसुरू असल्याची चर्चा आहे. या अगोदर अनेक पक्षांनी शासकीय रुग्णालयात कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची कमतरता असल्याचे निवेदने दिलेले असून त्याकडे शासनाचे अध्यापही दुर्लक्षच दिसत आहे.
.jpg)
