ट्रकच्या भिषण धडकेत पती - पत्नी व चिमुकलीचा जागीच मृत्यू......
तर दुसर्या दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी......
नादुरुस्त रसत्या मुळे घडला अपघात....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा ते सास्ती मार्गावरील धोपटाळा गावाजवळ एका भरधाव वेगाने जाणा-या ट्रक चालकाने तिघांना चिरडले. यात दुचाकीस्वार आई-वडील व मुलगी अशा तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घडला. ट्रक चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याची प्राथमिक माहिती कळते.
धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे निलेश वैद्य वास्तव्याने राहत होते. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जवेरी पेट्रोल पंप जवळ राजुरा कडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा जागीच मृत्यु झाला.
तर समोर याच ट्रकने दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
या भीषण अपघातात 35 वर्षीय निलेश मंगेश वैद्य, 30 वर्षीय रुपाली निलेश वैद्य व 3 वर्षीय राही यांचा जागीच मृत्यू झाला, याच ट्रकने समोर जाऊन प्रज्ञा प्रशाद टगराफ (33 वर्ष) व प्रसाद राजाबाई टगराफ (40 वर्ष) दोन्ही रामपुर येथील यांना धडक दिल्याने दोघेही जखमी आहे. जखमींना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी ट्रकचालक यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील तपास राजुरा पोलिस करीत आहे.
अपघात झाल्यावर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी करीत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतली होती, मात्र वेळीच दंगा पथक पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
सदर अपघात फुटलेल्या रस्त्यांमुळे झाला असल्याचीही चर्चा आहे. राजुरा सास्ती मार्गावर धोपटाळा गावाजवळ रस्ता पुर्णपणे फुटला असुन ह्या मार्गावरून अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. फुटलेल्या मार्गामुळे अवजड वाहन जाताच धुळीचे लोट उडत असल्याने दुचाकीस्वारांना समोरचे काहीही दिसत नाही त्यामुळे अपघाताची शक्यता कायम असते मात्र प्रशासनाने ह्याकडे कायम दुर्लक्ष केल्याने अखेरीस एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. आतातरी निद्रिस्त प्रशासन जागे होऊन रस्ता दुरुस्त करणार की अजुन बळी जाण्याची वाट बघणार असा संतप्त प्रश्न धोपटाळा वासियायांनी केला आहे.

