Top News

Public protest against the assault on the journalist. A statement to the Chief Minister through the Tehsildar on behalf of the Voice of Media Journalists Association.

पत्रकाराला झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध....


व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.


 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना घडली,या घटनेचा जाहीर निषेध करत व्हाईस ऑफ मीडिया आर्णी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले,पत्रकार संदीप महाजन यांच्यावर आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली होती,पत्रकारावर झालेला हल्ला आम्ही कधीच सहन करणार नाहीत,पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे,आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच दोषींना तात्काळ अटक करण्यात यावे,पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करावे,अशा भावना पत्रकार बांधवांनी व्यक्त केल्या,लोकप्रतिनिधींनी संयम बाळगून आपले कर्तव्य बजावणे अपेक्षित असताना लोकप्रतिनिधीकडून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना शिवीगाळ व मारहाण करणे कितपत योग्य आहे,पत्रकारांशी अपमानास्पद वागणूक अथवा गलिच्छ वक्तव्य करू नये,असा समज आमदार किशोर पाटील यांना आपल्या स्तरावरून देण्यात यावे असे निवेदन मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना आर्णी तहसीलदार यांच्या मार्फत व्हाईस ऑफ मीडिया आर्णी तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले, पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या मारहाणी बाबत व्हॉइस ऑफ मिडीया आर्णी तालुक्याच्याच्या वतीने निषेध करण्यात आलेत,यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे आर्णी तालुकाध्यक्ष राम पवार,करण शेलकर (सचिव)अविनाश चव्हाण,संदीप कांबळे, सुरेश राठोड, दुर्गेश कर्नेवार,हिरासिंग राठोड,रमेश राठोड,गणेश एकंडवार,प्रफुल जाधवसह तालुक्यातील बहुतांश पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post