Top News

नागभीड येथील प्रसिद्ध राम मंदिर देवस्थानात विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस उत्साहात संपन्न; बोथली येथील बजरंग दलाच्या कार्यकारिणीची घोषणा

 श्रीराम मंदिर नागभीड येथे धार्मिक कार्यक्रमांसह प्रबोधनपर मार्गदर्शन; जय दैवलकर यांचा सत्कार





नागभीड : विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिवसानिमित्त श्रीराम मंदिर, नागभीड येथे विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरणात भजन, दहीहंडी, प्रबोधनपर मार्गदर्शन आणि आरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भजन मंडळ पारडी (ठवरे) यांच्या भक्तिमय भजनाने झाली. भजनाच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री श्री. रोशन नवघडे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणातून त्यांनी हिंदू समाजाचे संघटन, सामाजिक एकोपा, संस्कार आणि युवकांची सामाजिक भूमिका याबाबत उपस्थितांना प्रबोधन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषद ब्रह्मपुरी जिल्हाध्यक्ष वासुदेवपाटील गहाणे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. जयश्री गरफडे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमामागील उद्देश तसेच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांची माहिती उपस्थितांसमोर मांडली.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज  हंबडेॅ, हरिभाऊ गरफडे, अजय काबरा, गणेश पुंडे, प्रिया लांबट यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



बोथली गावातील बजरंग दल कार्यकारिणीची घोषणा

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे बोथली गावातील बजरंग दलाच्या कार्यकारिणीची घोषणा. यावेळी बोथली गावातील नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. गावपातळीवर संघटनात्मक कार्याला चालना देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली असून, आगामी काळात विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या.

यावेळी संघटनेच्या कार्यात योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. बजरंग दल चा कार्यकर्त्यां जय दैवलकर यांनी आंतराष्ट्रीय स्पर्धेमधे भारताचे प्रतिनिधीत्व करून कझाकिस्थान या देशातुन 2 सुवर्णपदक आणुन भारताचे नाव जगभरात अभिमानाने फुलवले. आपल्या छोट्याशा नागभिडच नाव जगभरात अभिमानाने फुलवले आहे त्याच शाल व शिफल देउन सत्कार करण्यात आला.

धार्मिक कार्यक्रमांनी रंगला स्थापना दिवस

स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात धार्मिक परंपरेला विशेष महत्त्व देण्यात आले. श्रीराम मंदिर परिसरात भगव्या पताकांनी सजावट करण्यात आली होती. भक्तिमय वातावरणात भजनानंतर दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर प्रबोधनपर भाषण झाले आणि सायंकाळी आरती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अभिषेक जयस्वाल, अशोक पिसे, अतुल डोळस, ओम जांभुळकर, भालकरी कन्नाके। मंगेश कुर्झेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनातून संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

श्रीराम मंदिर नागभीड येथे झालेल्या या कार्यक्रमामुळे स्थापना दिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक कार्यक्रम, प्रबोधनपर मार्गदर्शन, कार्यकर्त्यांचा सत्कार आणि बोथली गावातील बजरंग दलाच्या कार्यकारिणीची घोषणा अशा विविध उपक्रमांनी विश्व हिंदू परिषद स्थापना दिवसाचा कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Previous Post Next Post