Top News

Many thanks to all - Sudhir Mungantiwar, Minister of Forests, Cultural Affairs and Fisheries and Guardian Minister of Chandrapur-Gondia District

सर्वांचे मनापासून आभार - सुधीर मुनगंटीवार,वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदीया जिल्हा पालकमंत्री



वंदे मातरम

माझ्या जन्मदिनानिमित्त अनेक माध्यमातून आपण हृदयापासून दिलेल्या शुभेच्छांनी मी अक्षरशः भारावलो आहे. आपल्यासारख्या हितचिंतकांमुळे मला सदैव लोकसेवेचे बळ आणि कार्यतत्पर राहण्याची प्रेरणा मिळते. आपलं प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्यासोबत कायम राहील, असा विश्वास आहे. तुम्हां सर्वांचे आभार मानून औपचारिकता निश्चितच करणार नाही,आपल्या ऋणात सदैव राहणे पसंत करेन.


प्रेम आपुले सदैव ऐसे

बहरावे माझ्या अंगणी

लोकसेवेची शक्ती आणिक

कायम द्विगुणित व्हावी


आपला स्नेहांकित

सुधीर मुनगंटीवार 

वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर-गोंदीया जिल्हा पालकमंत्री

Previous Post Next Post