Top News

Mahatma Jyotiba Phule College, Balharshah Department of Sociology organized a Mentoring Lecture under NEP - 2020 week festival....

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्हारशाह समाजशास्त्र विभागातर्फे NEP - 2020 सप्ताह महोत्सवाअंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन....



 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 


दिनांक 31 /8 / 2023 रोजी समाजशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20-20 च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने " राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह " या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले . 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका प्रा. सौ. निवेदिता पातुरकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बादलशहा चव्हाण , शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. डॉ. बालमुकुंद कायरकर , समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी भेंडे शर्मा उपस्थित होत्या. 

प्रा. निवेदिता पातुरकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती देत मार्गदर्शन केले. तर प्रा.डॉ.बादलशहा चव्हाण यांनी नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या दृष्टीने चांगले कशा पद्धतीने आहे इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी भेंडे शर्मा यांनी केले तर संचालन प्रा. मोहनिष माकोडे आणि आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सौ पल्लवी जुनघरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post