बल्हारशाह पोलिसांनी १४ किलो गांजा सह २ आरोपींना केली अटक........
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
चंद्रपूर जिल्हा सह बल्हारशाह शहरातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याच चीत्र दिसत आहे, त्याला रोखण्यासाठीच्या सर्व व्यवस्था अपयशी ठरत असल्याच चीत्र देखील दिसत आहे, शहरात गांजा, अफीम, ड्रग्स, बनावट दारू, बनावट तंबाखू इत्यादी सापडणे यात काही नवीन नाही.
हेही वाचा 👉🏻 धक्कादायक! विदर्भातील प्रसिद्ध पर्यटक स्थळी दोघांचा मृत्यु तर चार पर्यटक जखमी.....
पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गांजा तस्कर ठरवून दिलेल्या ठिकाणी गांजा नेऊन अमली पदार्थाचा धंदा करत आहेत, शहरात हा धंदा कोणाच्या सहाय्याने सुरू आहे? हा झाला तपासाचा विषय!
गुप्त माहितीच्या आधारे बल्हारशाह पोलिसांनी ८ एप्रिल २०२३ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास साईबाबा वार्डातील एका घरावर छापा टाकून दोघांसह १४ किलो गांजा जप्त केला.१४ किलो गांजाची बाजारातील किंमत सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये लावण्यात आली आहे.
हेही वाचा 👉🏻 धक्कादायक! विदर्भातील प्रसिद्ध पर्यटक स्थळी दोघांचा मृत्यु तर चार पर्यटक जखमी.....
या छापेमारी कारवाईत पोलिसांनी आरोपी मंगेश भाऊराव ठाकरे (22 रा. साईबाबा वार्ड) आणि मोहसीन सय्यद उर्फ लाला (35) यांना गांजासह पोलिस उपनिरीक्ष चेतन टेंभुर्णे यांच्या चमुने अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात पोलिस पथक ते करीत आहे.
हेही वाचा 👉🏻 धक्कादायक! विदर्भातील प्रसिद्ध पर्यटक स्थळी दोघांचा मृत्यु तर चार पर्यटक जखमी.....
शहरात व जिल्हात अनेक अवैद्य धंदे सुरु असुन पोलिस त्यांवर कायंमचा तोडगा काढन्यात अपयशी ठरतांनाचे चीत्र दिसत आहे, छोटे छोटे मासोळ्या पोलिसांच्या गळाला लागतात मात्र मोठी मासोळी कधी हाती लागेल व अवैद्य धंद्यावर कधी अंकुश लागेल हे पहाने महत्वाचे.
हेही वाचा 👉🏻 धक्कादायक! विदर्भातील प्रसिद्ध पर्यटक स्थळी दोघांचा मृत्यु तर चार पर्यटक जखमी.....