Top News

Guidance program for students regarding Cybercrime and POSCO Act 2012 was completed at Shree Sai Industrial Training Institute, Chandrapur.

विद्यार्थ्यांना सायबर क्राईम व पोस्को ॲक्ट 2012 यासंदर्भात श्री साई औद्योगिक  प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न........


 दिवाणी न्यायाधीश आणि सदस्य सचिव,जिल्हा विधी प्राधिकरण चंद्रपुर सुमित जोशी, सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रा. निलेश बेलखेडे, सायबर गुन्हे विभागाचे मुजावर अली यांची प्रमुख उपस्थिती......



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,चंद्रपुर द्वारा संचालित श्री साई औद्योगिक  प्रशिक्षण संस्था,चंद्रपुर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या जयंतीचे औचित्य साधून " CYBER CRIME & POCSO ACT" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


       कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.



      ह्यावेळी  मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून येरगुडे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट,चंद्रपुर चे उपाध्यक्ष अभिषेक व्ही.येरगुडे ,प्रमुख उपस्थिती व सत्कारमुर्ती प्रा.निलेश बेलखेडे ( सिनेट सद्यस्य,गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली ) प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून सुमित जोशी ( दिवाणी न्यायाधीश आणि सदस्य सचिव,जिल्हा विधी प्राधिकरण चंद्रपुर ), मुजावर अली सर ( सायबर गुन्हे विभाग,चंद्रपुर ) तसेच श्रीमती सपना निरंजने ( सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच CWC सद्यस्य ), प्राचार्य राजेश पेशट्टीवार यांची प्रामुख्याने उपस्थित होते.



       सुमित जोशी यांनी "POCSO ACT" ह्यावर उत्कृष्ट मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली,मुजावर अली यांनी "सायबर गुन्हे आणि खबरदारी" ह्याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले,श्रीमती सपना निरंजने ह्यांनी महिला सुरक्षेवर उपयुक्त मार्गदर्शन केले तसेच सिनेट सदस्य निलेश बेलखेडे ह्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही वाचविण्याचा दृष्टीने  शालेय शिक्षणासोबतचं, सामाजिक जिवनात युवकांचे कर्तव्य ,त्यांच्या भुमिका काय असायला हव्यात या विषयावर मार्गदर्शन केले.



     ह्या कार्यक्रमात नवनियुक्त सिनेट सद्यस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, व युवासेना विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य, प्रा. निलेश बेलखेडे ह्यांचा संस्थेतर्फे शाल-श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  राजेश पेशट्टीवार,संचालन  प्रवीण लांजेवार आणि आभार प्रदर्शन कु.वर्षा गावंडे ह्यांनी केले.

       कार्यक्रमास सर्व निर्देशक आणि कर्मचारी वर्ग तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post