Top News

Shocking! Two dead and four injured at famous tourist spot in Vidarbha Bees attacked the tourists who went for a tour of Seven_Sisters_Hill ..... an atmosphere of fear among the tourists...

 

धक्कादायक! विदर्भातील प्रसिद्ध पर्यटक स्थळी दोघांचा मृत्यु तर‌ चार पर्यटक जखमी.....


सात बहीनींचा डोंगर फीरायला गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला.....पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण.....


हल्यात २ ठार ४ जखमी.....


प्रशासन पर्यटन स्थळी सुधारना व उपाय योजना करेल‌ का?.....पर्यटकांना पडला प्रश्न.....




  विदर्भ माझा न्युज 24 - पेरजागड  

विदर्भातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे तर चार जण गंभीर जखमी आहेत. नागभीड तालुक्यातील पेरजागड येथील सातबहिणींचा डोंगर येथील ही घटना आहे. #Seven_Sisters_Hill 



अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असं मृतांचं नाव असून, त्या दोघांचं वय अंदाजे 60 वर्ष आहे. मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने ही दुर्देवी घटना‌ घडली. #Seven_Sisters_Hill

 हा डोंगर चढण्या करीता जितका अवघड तितकाच जास्ती उतरण्यासाठी अतिशय अवघड असल्यानं ते डोंगर उतरू शकले नाहीत आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. #Seven_Sisters_Hill 



सात बहीनीच्या डोंगरावर महादेवाचं मंदिर......

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, विदर्भातील चंद्रपुर जिल्हातील नागभीड तालुक्यात पेरजागड येथील सातबहिणीचा डोंगर म्हणून हे प्रसीद्ध ठिकाण आहे. या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. या महादेवाचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात. मात्र या डोंगरावर मोठ्याप्रमाणात मधमाशांची पोळी आहेत. काल दुपारी अचानक मधमाशांनी हल्ला केला. #Seven_Sisters_Hill 

या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. #Seven_Sisters_Hill



डोंगरावरुन खाली उतरता न आल्याने मृत्यू....

अशोक मेंढे आणि गुलाबराव पोचे असं मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींचं नाव आहे. हा डोंगर खाली उतरण्यासाठी अतिशय अवघड असा आहे. त्यामुळे जेव्हा मधमाशांचा हल्ला झाला तेव्हा त्यांना खाली उतरता आले नाही. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री ११:०० वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह एका Ngo च्या मदतीने डोंगराच्या खाली आणण्यात आले. #Seven_Sisters_Hill 


लोकप्रतिनिधी आणी प्रशासशाचे दुर्लक्ष.....

विदर्भातील आणी जिल्हातले हे जनु महाबळेश्वरच विदर्भासह विदर्भाच्या बाहेरून देखील पेरजागड येथे मोठ्या प्रमानात पर्यटक येत असतात मात्र प्रशासना तर्फे इथे योग्य त्या उपाय योजना नाहीत. स्थानीक लोकप्रतिनिधी सूद्धा या पर्यटन स्थळा कडे दुर्लक्ष करून बसले आहेत. विदर्भातील हा पर्यटन स्थळ अती प्रसिद्ध असुन या कडे सर्वांचे दुर्लक्ष दिस्ते आहे.


घनदाड झंगलात वसलेल्या या पेरजागड येथील सत बहीनींच्या डोंगरावर जायला नीट रस्ता नाही. डोंगर चढतांना रिलींग नाही. (रिलींग वरच्या भागात काही ठीकानी दिस्ते मात्र उर्वरीत ठीकानी रीलींग नाही.) डोंगर चढायला एक ते दीड तास लागतो तीतकाच उतरायला ही डोंगराच्या वर चढल्यास सर्वस्त्र धुकार व हिरवीगार डोंगर आणी झाडी दिसतात हे पाहुन सर्व थकवा दुर होतो, मात्र वर्ती सुद्धा कडघर नाही त्या मुळे जोराचा वारा आल्यास कुनी तिथुन पडण्याची भिती नाकारता येत नाही. 


सातबहीणीच्या डोंगरावर फीरायला विदर्भासह विदर्भाबाहेरील पर्यटक हजेरी लावत असताता त्या द्रुष्टी कोनातुन प्रशासनाने उपाय योजना करण्याची मागनी आता पर्यटकांन कडुण होत आहे.


डोंगर चढतांना वाटेत कींवा डोंगरावर पाण्याची सुवीधा नाही त्या मुळे तहानलेल्या पर्यटकांना पाण्या विना डोंगर चढाव व उतराव‌लागते, डोंगरावर जातांना पाण्याची बोटल‌ विकत घेऊंन सोबत बाळगावी‌लागते डोंगरावर ये जा करतांना तोच पाणी पर्यटकांना वाचवून वाचवून प्यावे लागते. त्या मुळे प्रशासनाने या ठीकानी डोंगरावर चढतांना व उतरतांना पीण्याच्या पाण्याची सोय तथा लाईट ची व्यवस्था करणे आवश्यक असल्याच चीत्र दिस्ते त्याच प्रमाने या परीसरात येणार्या पर्यटकांना होणार्या गैरसोयी बद्दल प्रशासनाने लक्ष‌ केंद्रीत करून विचार पुर्वक निर्णय घेऊन या परीसरात उपाय योजना कराव्यात अशी मागनी पर्यटकांकडुण केली जात आहे. 


आता या घटनेनंतर पर्यटन स्थळाची सुधारना व उपाय योजना प्रशासना‌ तर्फे केल्या जातील का? की हे पर्यटन स्थळ पर्रटकांन करीता बंद केले जाते? अशी कुजबुज आता पर्यटकांन मध्ये सुरु आहे. 



Previous Post Next Post