Top News

The illegal digging of the well in the irrigation pond itself...

चक्क सिंचन तलावातच विहीरीचे अवैद्यरीत्या खोदकाम......


सरपंच्यांनी केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार.......


सिंचन तलावातच केला अतिक्रम.....

 


 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी  


आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा बारभाई ग्रामपंचायत हद्दीतील सिंचन तलावामध्ये बारभाई ग्रामपंचायतची कुठलीही परवानगी न घेता सदर तलावामध्ये अतिक्रमण करून विहिरीचे खोदकाम करण्यात येत आहे.

सदर तलावामध्ये विहीर झाल्यास, तलावाची उर्वरित जमीनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, सदर तलावात विहीर झाल्यास तिथे प्रत्यक्ष डिपी येणार आणि डीपी आल्यास तलावाच्या उर्वरित जमिनीवर अतिक्रमण होणार, अतिक्रमण झाल्यावर, तलावातील सर्वच पाणी अतिक्रमण धारक सिंचनासाठी घेणार, असे झाल्यास ज्या उद्देशाने जनावरांना आणि नागरिकांना पाणी मिळण्यासाठी शासन खर्च करतोय त्यावर पाणी फिरणार, असे मत बारभाई ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप जाधव यांनी व्यक्त केले आहे. 

सरपंचांनी वारंवार तलावात वीर खोदण्यास नकार दिला तरी हेतू पुरस्कार त्याच जागेवर ग्रामपंचायतीची कुठलीही ना हरकत न घेता अतिक्रमण करून विहिरीचे खोदकाम करण्यात येत असल्याची भावना सरपंच रदिप जाधव यांनी व्यक्त केली.

  खोदण्यात येत असलेल्या विहिरीचे भविष्याच्या दृष्टिकोनातून गावातील नागरिकांना तथा पाळीव जनावरांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या विहिरीमुळे तलावाची भिंत फुटण्याची भीती सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी संबंधितावर कारवाई करण्यात यावी अन्यथा पुढील घडणाऱ्या घटनेला सर्वस्वी संबंधित विभाग जबाबदार राहील अशी लेखीतक्रार बारभाई ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांना एका निवेदनातून केली आहे.

Previous Post Next Post