Top News

Hanuman Jayanti celebrated with enthusiasm at New Mhada Colony in Datala.....

दाताळा येथील नवीन म्हाडा कॉलोनी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी.....




 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 

श्री हनुमान देवस्थान म्हाडा कॉलोनी दाताळा येथे मागील चौदा वर्षा पासून दर वर्षी हनुमान जन्मोस्तव साजरा करण्यात येतो.

 दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सर्व भाविक भक्तांनी हर्षउत्साहात हनुमान जन्म साजरा केला. आधल्या दिवशी रात्री महिला मंडळाचे व पुरुष मंडळाचे भजन कार्यक्रम व सकाळी पाच वाजता श्री हनुमान जन्म साजरा करण्यात आला नंतर गोपाळ काला व रात्री कॉलोनीतील सगळ्या भाविक भक्तांन करिता भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. 



श्री हनुमंताच्या जन्मोस्तव कार्यक्रम निमित्य आरती, भजन व कीर्तनाने संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला होता. सामाजीक कार्यकर्ते योगेश मुऱ्हेकर व ईश्वर सहारे, अविनाश ऊके यांनी वसाहतीतील सर्व नागरिकांचे कार्यक्रमाला सहकार्य व मदत केल्या बद्दल वसाहतीतील नागरीकांनी विशेष आभार मानले.

 तसेच कार्यक्रमाला श्रमदानं व अन्नदान जलदान करणाऱ्या  सर्व व भाविक भक्त्याचें विशेष आभार मानले. आयोजक मंडळात  काशिनाथ निघोट, महेंद्र भुजाडे, प्रभाकर येलमुले, चव्हाण , बाल्या आडपेवार, प्रशांत पुल्लकवार, मोनू पुल्लकवार, सचिन पुल्लिंवार,अजिंक्य ओगुलवार, हर्षल येलमुले, संतोष  ऐलंट्टीवार, रींगल झुनघरे, जितेंद्र सोमलकर,इत्यादी असंख्य भाविक भक्त उपस्थित होते.कार्यक्रम सुरळीत व आनंदात साजरा झाला.

Previous Post Next Post