Top News

Antargaon to Savli Sadoba road work delayed.....passengers have to face immense hardship.....

अंतरगाव ते सावळी सदोबा रस्त्याचे काम संथगत.....प्रवाशांना करावा लागतोय अतोनात त्रासाचा सामना.....




विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



आर्णी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या सावळी सदोबा ते आर्णी रस्त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने,या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे,अपूर्ण रस्त्यामुळे अपघात होत असून,वाहनाचेही नुस्कान होत आहे,संबंधित अभियंता यांना वारंवार सांगून सुद्धा,याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे,सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करीत आहे,अंतरगाव ते सावळी सदोबा या रस्त्याचे अंतर 15 किलोमीटर असून,या मार्गावर केळझरा(वरठी)हेटी,चातारी,बेलोरा,

कृष्णनगर,सावळी सदोबा उमरी,कापेश्वर,आयता, कवठा,खड्का सह बहुतांश गावे येतात,विशेष म्हणजे आर्णी हे तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने या परिसरातील गावातील नागरिकांना खाजगी व शासकीय कामाकरिता याच मार्गाने प्रवास करावा लागत आहे, सावळी सदोबा परिसरामध्ये अनेक गौण खनिजाचे रेती घाट असल्याने रेतीच्या जड वाहनाची वाहने या मार्गावरून दिवस रात्र ये-जा करीत असतात,त्यामुळे कमी दर्जाच्या रस्त्यामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झालेली होती,मात्र मागील काही महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असून,सदर काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे,काही ठिकाणी रस्ता एकच बाजूला केल्याने त्यावरून रस्त्याची खोली वाढल्याने वाहने उलटी होऊन वाहण्याचे नुकसान होत आहे, शिवाय वाहनांना रस्ता क्रॉस करताना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकाकडून होत आहेत.

सदर  रस्त्याचे काम अतिशय संथगतीने चालू असल्याने रस्त्यामध्ये टाकलेल्या मुरूम व गिट्टी मुळे प्रवाशांचा अपघात होत आहे,रोज या रस्त्याने प्रवास करणार्या प्रवाशांचे छोटे-मोठे अपघात होताना दिसत आहे,या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवासांना मागील दोन महिन्यापासून धुळखात प्रवास करावा लागत आहे,त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे,सदर रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधीने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Previous Post Next Post