पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळणार का? कापसाच्या वायद्यांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे....
विदर्भ माझा न्युज 24 - झरी
राज्यात अतिवृष्टीने अनेक हेक्टर कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरासरी कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. एकीकडे सर्व वस्तूंचे दर वाढत आहे. पण राज्यातील कपासाचे दर घटतच चालले आहे.अलीकडे दिवसांमध्ये कापूस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या तुलनेत कापसाला अपेक्षेप्रमाणं भाव मिळालेला नाही. खाजगी व्यापाऱ्यांकडे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असला तरी अपेक्षेप्रमाणं दर मिळत नसल्यानं कापूस साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
शेतकरी सध्या व्यापारांना कापसाची विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रतिक्विंटल ८२०० ते ८५०० रुपयांपर्यंत असलेला कापूस आता आठ हजारांवर स्थिरावला आहे. बाजार भाव वाढेल या अपेक्षेनं शेतकरी कापूस साठवून ठेवत असल्याचं काही शेकर्यांनी सांगितले. भावात सारखी घसरन होत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करत आहे.
कापसाच्या वायदा बाजार आता १३ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. यामध्ये परिस्थितीचा वेध घेतला असता तज्ज्ञांनी कापसाच्या दरात वाढीची शक्यता वर्तवली आहे. आगामी चार महिन्याच्या काळात कापसाच्या दराची स्थिती काय राहणार याचा अंदाज व्यापाऱ्यांना येत असल्याने कापसाची चमक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कापसाचे बाजार भाव....
सरकीच्या दरात दोनशे रुपये पर्यंत कमी आलेली आहे त्यामुळे तेलाचे भावही कमी झाले आहेत. कापसाच्या दरातील दोनशे रुपयापर्यंत घट झालेली आहे.
दरम्यान अकोला जिल्ह्यात चांगला दर मिळत आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाचे दर ८५०० च्या दरम्यान असून शेतकऱ्यांना ९ हजारांपेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे.
त्यातच खतांचे भाव, औषधीचे भाव, मजुरी खर्च शेतकरी अथोनाथ खर्च करून बसला आहे. आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील या आशेने शेतकरी कापूस साठवून बसला आहे..जर भाव वाढला नाही तर मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. जर सरकारने लक्ष दिले तर निश्चितच शेतकऱ्यांचा काही ना काही फायदा होईल. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे...


