Top News

Prize Distribution of Kabaddi Tournament at Kalmana....

कळमना येथे कबड्डी स्पर्धेचे बक्षीस वितरण....


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा  


जय हनुमान क्रीडा मंडळ कळमना यांच्या वतीने पुरूषांचे दोन दिवसीय भव्य कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कळमनाचे सरपंच, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस तथा ओबीसी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. 

         यात प्रथम पारितोषिक होम बाल क्रीडा मंडळ गोवरी यांनी तर न्यू छत्रपती क्रीडा मंडळ निमणी यांनी दुसरा क्रमांक प्राप्त केला. सर्व विजेत्यांचा सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बोलताना श्री. वाढई म्हणाले, खेळाडूंनी आपले कौशल्य अधिक मजबूत करून सातत्यपूर्ण कामगिरी करीत जिल्हा, राज्य स्तरावर सुद्धा झेप घेतली पाहिजे असे मत व्यक्त केले. 

     या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी सरपंच सुधाकर पिंपळशेंडे, माजी उपसरपंच महादेव ताजने, प्रभाकर साळवे, दत्ता पिंपळेशेंडे, साईनाथ पिंपळशेंडे, मंगेश ताजने, मंडळाचे अध्यक्ष वैभव आत्राम यासह सर्व क्रीडा मंडळाचे सदस्य, समस्त गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post