Top News

Krantijyoti Savitribai Phule Jayanti & Girl Child Day Celebration by Mali Society, Swarajya Aadhaar Foundation....

सावित्रीबाई फुले यांचा स्त्री शिक्षणासाठी केलेला संघर्ष प्रेरणादायी आमदार सुभाष धोटे यांचे प्रतिपादन


मुलींनी शिक्षणाची कास धरावी,सध्या स्पर्धेचे युग आहे, मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी - जेष्ठ विदर्भवादी नेते ॲड.वामनराव चटप


माळी समाज, स्वराज्य आधार फाऊंडेशनतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


सावित्रीबाई फुले यांचे कार्य व त्यांनी केलेला संघर्ष नव्या पिढीतील महिलांसाठी प्रेरणादायी आहे असे मत आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केले.

माळी समाज, स्वराज्य आधार फाउंडेशन राजुरातर्फे कन्नमवार सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती व बालिका दिन कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून जेष्ठ विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप, मार्गदर्शक म्हणून समीर लेनगुरे, इंजि. नीलेश बेलखेडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक अरुण धोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाजी आदे, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सतीश धोटे, प्राचार्य किशोर उईके, ज्योती शेंडे, सविता वाढई, अमोल राऊत, दिनेश पारखी, आशीष करमनकर, रवी शेंडे, दुधे, स्वप्नील मोहूर्ले उपस्थित होते.



ज्या सावित्रीबाईंनी समाजाचा छळ, अपमान सहन करून स्त्री शिक्षणाचे दार खुले केले. त्या  सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत मुलींनी शिक्षणाची कास धरावी. सध्याचे स्पर्धेचे युग आहे. मुलींनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन जेष्ठ विदर्भवादी नेते  माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले.



यावेळी समाज प्रबोधन व विद्यार्थी युवा संवाद कार्यक्रम पार पडला. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांची भव्य मिरवून काढण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समीक्षा जीवतोडे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली.

समीर लेनगुरे, इंजि. निलेश बेलखेडे, प्राचार्य किशोर उईके, समीक्षा जीवतोडे, विशाल शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रतीक्षा वासनिक हिने केले. संचालन विशाल शेंडे यांनी, तर आभार मंजू शेंडे यांनी मानले. आयोजनासाठी माळी समाज, स्वराज्य आधार फाउंडेशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post